जिपच्या आरोग्य विभागात 481 पदे रिक्त

गोंदिया◼️ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागावर आहे. असे असले तरी या विभागात तब्बल 481 पदे रिक्त असल्याने शासन गरीब जनतेच्या आरोग्य प्रती किती गंभीर आहे, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे कार्यरत अपुरे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्‍यांच्या खांद्यावरच आरोग्य विभागाचा डोलारा सुरू असल्याचे सांगितले जाते. कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे उत्तम आरोग्य सेवेची अपेक्षा कशी करावी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत उपस्थित होत आहे.

गोंदिया जिल्हा आदिवासी बहुल, डोंगराळ, दुर्गम व नक्षल प्रभावित आहे. आजही जिल्ह्यातील अनेक वस्त्या, वाडे, तांड्यावर आरोग्य सुविधा पोहचली नाही. पक्के रस्ते, शैक्षणिक सुविध नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 40 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पैकी 19 प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी क्षेत्रात आहेत. 258 आरोग्य उपकेंद्र आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला गत अनेक वर्षापासून लागलेले रिक्त पदांचे ग्रहण काही सुटता सुटेना. आरोग्य विभागात (Health Departments) वैद्यकीय अधिकार्‍यांसह विविध संवगार्तील तब्बल 481 पदे रिक्त असल्याची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात (Health Departments) विविध संवर्गातील 1400 पदे मंजूर आहेत. यापैकी 481 पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकार्‍यांची 8 पैकी 2 रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’च्या 72 पदांपैकी 5 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी गट बची 56 पैकी 20 दे रिक्त आरोग्य. पर्यवेक्षकांच्या 17 पैकी 9 पदे रिक्त, आरोग्य सहाय्यक (पुरुष) 64 पैकी 7 रिक्त, आरोग्य सहायिका (स्त्री) 40 पैकी 19 रिक्त, आरोग्य सेवक 196 पैकी 85 रिक्त. आरोग्य सेविका 336 पैकी 185 रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञांची 17 पैकी 4 रिक्त, औषध निर्माण अधिकारी 44 पैकी 10 रिक्त कनिष्ठ सहायकाची 47 पदांपैकी 8 पदे रिक्त, सफाई कामगारांच्या 40 पदांपैकी 26 रिक्त. स्त्री परिचराची 39 पदे मंजूर असून 13 रिक्त आहेत. पुरुष परिचारांची 125 पदे मंजूर असून 15 पदे रिक्त आहेत. अंशकालीन स्त्री परिसरांची 268 पदे मंजूर असून 72 पदे रिक्त आहेत. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी हे पदही रिक्त आहे असे एकूण 481 पदे रिक्त आहेत.

रुग्णवाहिकीची धुरा कंत्राटी चालकांवर

गोंदिया जिल्ह्यातील चाळीसही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (Health Departments) एकही स्थायी वाहनचालक नाही. वाहन चालकांची सर्व पदे ही कंत्राटी तत्वावर भरण्यात आली आहेत. अनेकदा यांना मानधन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ते आंदोलनाची हत्यार उपस्थित करीत असल्याने जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा ठप्प होते. त्याचा परिणाम जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांवर होतो.

आस्थापनेतही 5 पदे रिक्त

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या (Health Departments) आस्थापनेतही विविध पदे रिक्त असल्याची माहिती आहे. यात सहाय्यक प्रशासन अधिकारी 1, कनिष्ठ सहाय्यक 3 व आरोग्य सेवकाचे 1 पदे असे एकूण 5 पदे रिक्त आहेत.

दोन मोबाईल मोबाईल युनिट बंद

जिल्ह्यातील जंगलव्याप्त, दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात वेळेवर आरोग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी 6 मोबाईल देण्यात आले. दोन युनिट बंद आहेत. कार्यरत चार मोबाईल युनिटमध्ये वैद्यकीय अधिकारी, वाहनचालका व्यतिरिक इतर आरोग्य कर्मचार्‍यांची वानवा असल्याची माहिती आहे.

Share