कोहमारा येथील पथसंस्थेत चोरी करणारे आरोपी डुग्गीपार पोलीसांच्या जाळयात

सडक अर्जुनी – पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीत दि.१२/०९/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास मौजा- कोहमारा येथील सावित्री बाई फुले महीला ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेचे शटर तोडुन अज्ञात चोरटयांनी घरफोडी करुन पतसंस्थेतील —

१) २ डेल कंपनीचे मॉनीटर सीपीयू सह कि. ४०,०००/- रुपये,
२) एक हार्डडिस्क कि. २०००/- रुपये,
३) यु.पी.एस. कि.३००० /- रुपये असा एकुण ४५,०००/- रुपयाचा माल चोरी करुन पसार झालेल्या आरोपी विरुदध पोलीस स्टेशन डुग्गीपार ला फिर्यादी च्या तक्रारी वरुन अपराध क्र. १२/२०२३ कलम ३८०, ४५७ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर, यांनी गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे तपासा संबंधाने तपास सूचना केल्या होत्या. सदर संबंधाने वरिष्ठांचे आदेश व निर्देशांन्वये पो.ठाणे डूग्गीपार चे ठाणेदार श्री. आर.के. सिंगनजुडे यांनी पो . स्टे. चे विशेष तपास पथक तयार करुन पथका तील अमलंदार यांना पो.स्टे. परीसरात रवाना करण्यात आले.

पो.स्टे.चे सदर पथक अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना बल ढाबा सावंगी जवळ दोन ईसम संशयीत रीत्या फिरतांना दिसुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाबद्दल कशोशिने विचारपुस केली असता
१) शंकर ऊर्फ विक्की शालीकराम कोहळे वय १९ वर्ष
२) अविनाश चंद्रशेखर वाढई वय २२ वर्ष दोन्ही रा. सावंगी
यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे कडुन गुन्हयात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल किंमती ४५०००/- रू चे हस्तगत करण्यात आला आहे.

नमूद दोन्ही आरोपी पोलीस अटकेत असुन पुढील तपास ठाणेदार आर. के. सिंगनजुडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. मनोहर गावडकर हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. श्री निखील पिंगळे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री अशोक बनकर सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी श्री. संकेत देवळेकर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आर. के. सिंगनजुडे, सपोनि प्रमोद बांबोडे, हेड कॉस्टेबल मनोहर गावडकर, झुमन वाढई, पोलीस शिपाई सुनिल डहाके यांनी केली आहे.”

Share