नॅशनल हायवे सेफ्टी सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त 11 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत रोड सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
पत्रकार मुन्नासिंह ठाकुर चंद्रमणी बनसोड यांचा शाल श्रीफळ देहून सत्कार
देवरी /सडक अर्जुनी◼️
महामार्ग क्रमांक 06. चे चौपद्री ( चार लाईन रोड) करण्याचे काम करणारी अग्रवाल ग्लोबल एस एम जेवी कंपनी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रमोद पांडे सर प्रोजेक्ट मॅनेजर हे होते तर उद्घाटक :- सतीश देहंकर पी आय महामार्ग हायवे पोलीस केंद्र दुग्गीपार व पी आय प्रमोद कुमार बघेल सर, कंपनीचे डी पी एम राजेंद्र ठाकूर, सोहन पाल राजपूत, विपिन श्रीवास्तव आणि सेफ्टी मॅनेजर श्रीनिवास दांडू प्रामुख्याने उपस्थित होते.
दुग्गीपार महामार्ग पोलीस केंद्राचे pi. सतीश देहनकर सर व लाखनी गडेगाव महामार्ग पोलीस केंद्राचे Pi. प्रमोद कुमार बघेल सर . तसेच अग्रवाल ग्लोबल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे यांनी पत्रकार मुन्ना सिंह ठाकुर, चंद्रमुनी बनसोड हे वेळोवेळी पोलिसांना सहकार्य व दिवस असो की रात्र अग्रवाल कंपनीच्या कामगारांना जर काही झाला तर वेळेवर येऊन मार्गदर्शन करतात मदत करतात व उत्कृष्ट पत्रकारिता करिता या शेपटीच्या कार्यक्रमात त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी कंपनीतील 300. च्यावर अधिकारी व कामगार उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रसंगी युनियनचे अध्यक्ष यांनी शेपटी जॅकेट सेफ्टी बेल्ट सेफ्टी हेल्मेट वेळेवर देण्यात येतो व काही घटना घडली तर सर्व व्यवस्था कम्प्युटर द्वारे केली जाते असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्रीनिवास दांडू यांनी केले तर आभार भगवान अवकरी यांनी मानले.