ब्लॉसम शाळेत भरली शैक्षणिक साहित्याची आगळीवेगळी जत्रा

देवरी 10: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल निरनिराळे सहशालेय उपक्रम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी विषयांतर्गत उपक्रमाच्या माध्यमातुन आनंददायी अध्यापनाचा वापरतुन शिक्षण देत असते. शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात ब्लॉसम महोत्सवाला सुरुवात झाली असून यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी , सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित आणि कला विषयाच्या नानाविविध शैक्षणीक साहित्याची जत्रा भरविण्यात आली होती. यामध्ये इयत्ता १ली ते १० वी चे विध्यार्थी सहभागी झालेले होते.

आनंददायी शिक्षण आणि शैक्षणिक साहित्याच्या आधारे सोप्या पद्धतीच्या सहाय्यने दृकश्राव्य साहित्याच्या मदतीने अध्ययन अध्यापन प्रभावी करण्यात येते, तसेच इंग्रजी व्याकरणाला सुलभ करून कसा शिकविता येणार यावर चर्चा करून सदर शैक्षणिक साहित्याच्या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान शैक्षणिक साहित्यांचे निरीक्षण आणि गुणदान प्रा.ऊर्मिला परिहार, अल्का दुबे, शहनाज मिर्झा यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना ब्लॉसम महोत्सव २०२३ च्या बक्षीस वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या साहित्याचे इंग्रजी मराठी, हिंदी विषयातील शब्दांच्या जाती, काल, एकवचन, अनेकवचन अशा अनेक विषयांवर मॉडेल ,चार्ट तयार करून प्रदर्शन जत्रेत भेट देणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसमोर केले. यामुळे इंग्रजी सह सर्व विषयातील विद्यार्थ्यांची गोडी निर्माण होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.

सदर शैक्षणिक जत्रेला मृतरूप देण्यासाठी प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात नामदेव अंबादे , विश्वप्रित निकोडे, राहुल मोहुर्ले , नितेश लाडे , भोजराज तुरकर , वैशाली मोहुरले, नलू टेम्भरे संगीता काळे आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Share