महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे औपचारिकता साधून कोरची पोलीसांनी पकडला स्वच्छतेचा झाडू

कोरची : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औपचारिकता साधून पोलीस स्थापना सप्ताह साजरा करण्यात आला याचा एक भाग म्हणून कोरची पोलिसांनी नगराध्यक्ष हर्षलता भैसारे यांच्या उपस्थितीत पोलीसांनी स्वच्छतेचा झाडू पकडून मुख्य रस्त्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहामध्ये खुर्ची पोलिसांनी शांतता रॅली, महिला सुरक्षा राहिली रस्ता सुरक्षा रॅली सायबर क्राईम बद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन केले पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिन कामकाज कशा पद्धतीने केले जाते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, शस्त्राबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देऊन शस्त्र कशा पद्धतीने हाताला जातात याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली, .
स्वच्छता अभियान राबवित असताना स्वच्छता अभियानाचा एक भाग व्हावा म्हणून म्हणून यावेळी कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फरतडे, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, नगरसेवक दिलीप मडावी, भाजप नेते नंदलाल पंजवानी,हमीदखा पठान, नवभारत प्रतिनिधी आशिष अग्रवाल, दैनिक सकाळ तालुका प्रतिनिधीमनोज अग्रवाल, जितेंद्र सहारे माजी सैनिक तथा काँग्रेस नेते चतुर सिद्राम आदि मान्यवर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share