कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून नगरपंचायत निवडणुकीच्या कामात लागावे-आमदार सहषराम कोरोटे

देवरी येथे नगरपंचायतच्या निवडणूकी संदर्भात व शहर काँग्रेस ची बैठक

देवरी ४: भारताच्या स्वातंत्र्य पासून तर देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. सध्या देशात शेतकऱ्यांच्या नवीन कृषि कायद्य्या विरुद्ध आंदोलन सुरु आहे. आंदोलन स्थळापासुन अवघ्या ३५ ते ४० की.मी. अंतरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वास्तव्य आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलन स्थळी भेट देवुन आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या मागण्या विषयी चर्चा करण्याची वेळ नाही. आज आपल्या देशात जात-पात व धर्म-अधर्म ची राजनीति सुरु आहे. सध्या आपल्या देशात सांप्रादायीकतेचे वारे वाहत आहेत. ह्या सर्व बाबी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक लोकांना भेटून पटवून सांगणे गरजेचे आहे. जर काँग्रेस पक्षाला जीवंत ठेवायचे असेल तर सर्व कार्यकत्यांनी आपसातील मतभेद विसरून नगरपंचायत निवडणुकीच्या कामात लागावे असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.


देवरी येथे कोरोटे भवनात तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने देवरी नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भात शनिवार(ता.२ जानेवारी) रोजी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.


ही बैठक आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि काँग्रेस पक्षाचे नगरपंचायत निवडणुकीचे निरीक्षक डॉ. विनोद भोयर व गोंदिया जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई शहारे, जि.प.चे माजी सभापति राजेश नंदागवड़ी, देवरी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, माजी उपसरपंच परमजीत सिंह भाटिया, वरिष्ठ कार्यकर्ता अँड.प्रशांत संगीड़वार, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष बबलू कुरेशी, शहराध्यक्ष कुलदीप गुप्ता, हमीद मेमन, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, प्रशांत कोटांगले, अमीत तरजुले, कमलेश पालीवाल, वैभव जैन, संदीप मोहबीया, शार्दूल संगीड़वार यांच्या सह देवरी तालुका व शहरातील काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी तालुक्यातील पिंडकेपार येथील लता बड़ोले व त्यांची महिला चमु आणि देवरी येथील वार्ड क्र.१५ मधील प्रभाताई बहेकार व त्यांची महिला चमु व वार्ड क्र.१६ येथील रुखनलाल मड़ावी व त्यांची पुरुष कार्यकर्ता च्या चमुने तसेच बहुजन समाज पक्षाची वरिष्ठ महिला कार्यकर्ता शारदाताई ऊके व सौ. पारधीताई यांनी आमदार सहषराम कोरोटे यांच्या विकास कार्याशी प्रभावित होवून आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारूण काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांचे आमदार कोरोटे व उपस्थित पाहुण्यांनी पक्षाचा गमछा व पुष्पगुच्छ भेट देवून स्वागत केले.
दरम्यान निरीक्षक डॉ. विनोद भोयर व कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या इतिहास व विकासा बाबद माहिती दिली. व येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा नगरपंचायत कार्यलयावर फडकविन्याचे आवाहन केले.


या बैठकीचे प्रास्तावीक तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी तर संचालन माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके यांनी आणि उपस्थितांचे आभार युवक काँग्रेस चे प्रशांत कोटांगले यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share