लायंस क्लब च्या पुढाकाराने देवरी वरून नागपूर येथे नेत्र रूग्णांना शस्त्रक्रियेकरीता घेऊन एक बस रवाना

देवरी, ता.३०: लायंस क्लब देवरीच्या वतीने देवरी येथे भव्य नेत्रदान, नेत्रनिदान व नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन मागील ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र रुग्नांची तपासणी केली. यात २६ रुग्णांना डोळ्यात मोतीयाबिंदू व डोळ्यात जाळ असल्याने यांना नेत्र शस्त्रक्रियेकरीता मंगळवार (ता.२९ नोव्हेम्बर) रोजी संध्याकाळी देवरी वरून नागपूर येथील सुप्रसिध्द महात्मे आय बँक व आय हास्पीटल येथे हास्पीटलच्या बस ने रवाना करण्यात आले.
यात सविस्तर असे की, मागील ६ नोव्हेंम्बर रोजी लायंस क्लब देवरीच्या वतीने देवरी येथे नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. यात मोतीयाबिंदू व डोळ्यातील जाळ असलेले २६ नेत्ररूग्ण शस्त्रक्रियेकरीता पात्र होते. लगेच या बाबद लायंस क्लब देवरीच्या पदाधिका-यांनी महात्मे आय बँक व आय हास्पीटल नागपूर येथील नेत्रतज्ञांशी संपर्क केला व नेत्र रूग्णांच्या शस्त्रक्रियेची वेळ मागीतली नंतर लायंस क्लब देवरीचे अध्यक्ष पारस कटकवार, सचिव आफताब शेख(अन्नूभाई) व इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार व प्रयत्न करून नागपूर येथून नेत्रशस्त्रक्रिये करीता मंजुरी मिळताच आज मंगळवार(ता.२९ नोव्हेम्बर) रोजी लायंस क्लब चे अध्यक्ष पारस कटकवार यांच्या घरतासमोरून नागपूर जाण्यासाठी हास्पीटलच्या एकाबसची व्यवस्था करूण यात एकूण २६ नेत्र रुग्णांना बसवून शस्त्रक्रिये करिता रवाना केले. यात विशेष म्हणजे मागच्यावर्षी सुध्दा अशाच प्रकारे पुढाकार घेवून देवरी शहरातील २२ लोकांची नेत्रशस्त्रकिया करवून घेतली होती.
या प्रसंगी लायंस क्लब देवरीचे अध्यक्ष पारस कटकवार, सचिव आफताब शेख(अन्नूभाई), क्लँबच्या कँबिनेट आफिसर पिंकी कटकवार, कोषाध्यक्ष ज्योती रामटेककर, सदस्य मनोज मेश्राम,अनिल मेश्राम, तारेश मेश्राम, मनेन्द्र मोहबंशी, विजय पाटील, क्रिष्णा दखने यांच्या सह नेत्र रुग्णांच्या परिवारातील बहुसंख्य लोक प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share