शेतक-यांच्या धान विक्रीची मर्यादा हेक्टरी ५० क्विंटल आणी हजार रूपये बोनस जाहीर करा

■ आमदार कोरोटे यांची उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे मागणी

‌देवरी : चालु हंगामात (२०२२-२३) मध्ये गोंदिया जिल्ह्यासह आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्रात धान खरेदी करिता केन्द्रात शेतक-यांना धान विक्रीची मर्यादा ही हेक्टरी ५० क्विंटल व प्रति क्विंटल एक हजार रूपये बोनस जाहिर करा असी मागणी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी भेट घेवून शुक्रवार (ता.११नोव्हेंबर ) रोजी मुंबंई येथे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सादर केलेल्या निवेदनात गोंदिया जिल्ह्यासह आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतक-यांनी शेतात वाचलेल्या धान पिकाचे चुरना करायला सुरूवात केली आहे. तरी त्यांचे निघणारे धान पिक विकायला आता त्यांना खरेदी केन्द्र सुरू होण्याच्या प्रतिक्षा आहे.तसेच शेतक-यांना आपले धान विकायला खुप लांब अंतरावरील धान खरेदी केन्द्रात जावे लागते. अशा परिस्थितीत प्रत्येक गावा-गावात धान खरेदी केन्द्र सुरू करण्याची गरज आहे. आणी धान विकण्याच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५० क्विंटलची मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे.
त्याचप्रमाणे मागील महाविकास आघाडी सरकार ने सातसे रूपये बोनस दिले होते परंतू सतत वाढणा-या महागाईमुळे शेतक-यांना प्रति क्विंटल एक हजार रूपये बोनस त्वरीत दयावी अशी मागणी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना भेटून निवेदन सादर करून केली.

Print Friendly, PDF & Email
Share