मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करणा-या ठिकाणावर छापा मारुन ३४,०६०/- रुपायाचा मुद्देमाल जप्त, सालेकसा पोलिसांची कारवाई

Salekasa 07: गोंदिया जिल्हयात अवैधरित्या मोहफुलाची हातभटटी दारुची निर्मिती व विक्री करणा-यावर कार्यवाही करण्याचे निर्देश मा. पोलीस अधिक्षक गोदिया श्री. निखील पिंगळे सा. यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक गोदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांनी दिल्यावरुन व वरीष्ठांचे आदेशान्वये पो.स्टे सालेकसा हददी मधील मौजा मरकाखांदा येथे ठाणेदार पोलीस स्टेशन सालेकसा यांचे नेतृत्वात मौजा मरकाखांदा शिवारात दि. ०६/११/२०२२ रोजी मोहाफुल सडवा २०० किलो व इतर मोहाफुल रसायन व साहीत्य असा एकुण मुद्येमाल किमती. ३४,०६०/- रु चा माल मिळुन आले आहे.

आरोपी नामे कोमल राजेश उईके वय ३५ वर्ष रा. मरकाखांदा ता. सालेकसा जि. गोदिया – यांचेवर पोलीस स्टेशन सालेकसा येथे अप.क्र. ४८६ / २०२२ कलम ६५ (ई), ६६ (१) (ब) (क) (ड)(फ) महाराष्ट्र दारु बंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले आहे.

सदर कामगिरी वरीष्ठांचे निर्देश व आदेशान्वये ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, पोलीस उप-निरीक्षक गणेश शिंदे, चा.पो.ना. रितेश अग्नीहोत्री/ १६८६, पो. कॉ. अजय इंगळे / २१०२, पो.कॉ. राहुल रोकडे / १९०१ पो.कॉ. जयसिंग बैस / १२५९, यांनी सदर ची कार्यवाही केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share