सुकडी ग्रामपंचायतवर भाजप समर्थित पॅनलचा झेंडा

कामेश कल्लो सरपंचपदी विजयी : जनशक्तीचा विजयी

देवरी 18: देवरी – आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत निवडणुकीतील सुकडी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडवित भाजपने ८ पैकी ७ जागेवर विजय प्राप्त केला. या निवडणुकीत सरपंच थेट मतदारातून निवडायचा होता. त्यात भाजपच्या कामेश कल्लो यांनी विजय मिळविला, तर भाजपचे सूर्यभान मुंदी, रामेश्वर सलामे, संगीता केराम, वर्षा वाढई, रजवंता सलामे, हिवराज खल्लारी यांनी विजय प्राप्त केला. काँग्रेस व भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.

१६ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १७ तारखेला तहसील कार्यालय देवरी येथे घेण्यात आली. भाजपने या विजयाचा जल्लोष भाजप कार्यालयात साजरा केला. यावेळी माजी आ. संजय पुराम यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले. माजी तालुका अध्यक्ष प्रमोद संगिड़वार, तालुका अध्यक्ष अनिल येरणे, संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, सविता पुराम, अंबिका बंजार, शालिक गुरनुले, यशवंत गुरनुले, भीमराव ताराम, मोहन मिरी यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share