ककोडी येथे पोषण आहार अभियान संपन्न

देवरी 24: राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील ककोडी येथे पोषण आहार अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा शहारे जि. प.सदस्य होत्या. सदर कार्यक्रमाचे उद्गघाटक सविता पुराम म.बा.सभापती गोंदिया, सहउद्घाटक अंबिका बंजार प.स.सभापती , प्रमुख उपस्थिती अनुस्या सलामे प.स.सदस्य , सरपंच मडावी ,डॉ.रामटेकर , सुपरवायजर अंबुले , नेताम, सलामे गटशिक्षणाधिकारी महेंद्रमोटघरे , केंद्र प्रमुख राऊत, कावडे सर्व ककोडी बिट च्या सर्व सेविका यांच्या मदतनीस विद्यार्थी लाभार्थी उपस्थित होते.

मेळाव्यात पोषण अभियानाशी संबंधित पोषक आहार प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा , पोषण गीत आधी स्पर्धा घेण्यात आल्या.व विजेत्यांना प्रमुख उपस्थित अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले.

सदर पोषण अभियान मेळावा यशस्वी करण्यासाठी ककोडी अंगणवाडी बीट परिक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस व जि.प.प्राथ.शाळा , मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share