जिप सदस्य उषाताई शहारे यांच्याहस्ते आदिवासी भागातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार

देवरी /ककोडी 04: जिल्हा परिषद प्रा.शाळा चिल्हाटी येथे केंद्र ककोडी ला शिक्षण परिषद घेण्यात आली त्या कार्यक्रमामद्ये १२ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार जिप सदस्य उषाताई शहारे यांच्या कडून करण्यात आला. यावेळी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका एम. टी.सलामे, ककोडी चे केंद्र प्रमुख एस.जी.राऊत , मिसपिरी केंद्र प्रमुख एस.जी. बिसेन , गावचे पोलीस पाटील कुमांदास कुवरदाद्रा , डॉ.सोंनबान , कॉग्रेस कार्यकर्ता चिल्हाटी ,तिडके ,जनबंधू , पाटणकर ,मेश्राम , दोनोडे, सर्व मुख्याध्यापक, सहायक शिक्षक विद्यार्थी सत्कारमूर्ती कु.असलेशा देशमुख हिने वर्ग १२ कला विज्ञान शाखा 90% गुण घेऊन तालुक्यातून प्रथम स्थान मिळविला आहे. भार्गव रहांगडाले याने ८४% गुण घेऊन दुसरा स्थान मिळविला , कला विभागातून कु. शिवानी बैस हिने पहिला ७५% तर दुसरा सवई जोशी याने ७४% घेऊन दुसरा स्थान मिळविला आहे. ककोडी जिल्हा परिषद हायस्कूल मधून १० वी मधून कु. झनिशा सोणबान हिने ७८%घेऊन पहिला स्थान मिळविला आहे तर कु. करुणा कुवरदाद्रा ७५% घेऊन दुसरा स्थान मिळविला कु.मीनाक्षी ठेभूर्ने हिला ७२% तर कु. निकिता सोनबान ७१% गुण घेऊन यांनी प्रावीण्य प्राप्त केले यांच्या पुढच्या वाटचालीच्या शुभेच्या जिप सदस्य उषाताई शहारे तसेच सर्व शिक्षकानी दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share