देवरीचे आनंदराव नळपते यांची “पर्यावरण मित्र” पुरस्कारासाठी निवड

■ ५ जून रोजी चंद्रपुर येथे पर्यावरण सोहळ्यात पुरस्कार वितरण

देवरी १८: पर्यावरण संवर्धन विकास समिती चंद्रपुर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन रविवार( ता.५ जून) रोजी चंद्रपुर येथे आयोजीत पर्यावरण सोहळ्यात देवरी येथील सेवानिवृत्त कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ता आनंदराव नळपते यांची सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पर्यावरण मित्र या पुरस्करासाठी निवड करण्यात आली असून हा पुरस्कार सदर सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.
या पुरस्कराच्या निवडीबद्दल आनंदराव नळपते यांनी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष, दलित मित्र तथा आदिवासी सेवक व जेष्ठ पत्रकार डी.के.आरिकर आणि सचिव हरीष ससणकर यांचे आभार मानले आहे.
पर्यावरण मित्र पुरस्काराकरीता आनंदराव नळपते यांच्या निवडीबद्दल देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट समितीचे पदाधिकारी, सदस्यगण आणि शहरातील मित्रमंडळी व शुभचिंतकांनी अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share