शाळा सुरू होताच मिळणार गणवेश, ४.४९ कोटींचा निधी मिळाला; तालुकास्तरावर निधी झाला वितरित

गोंदिया : समग्न शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व मुली व सर्व मागासवर्गीय मुलांना दरवर्षी दोन जोड मोफत दिले जातात. त्यानुसार यंदा गणवेशासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला चार कोटी ४९ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मिळाला तो असून, तालुकास्तरावर वितरित करण्यात आला आहे. लवकरच तेथून शाळा व्यवस्थापन समित्यांना मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील. यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश हाती येणार, असे वाटते.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश तसेच पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यात काही दिवसांच्या उशिरा का होईना मात्र पुस्तकेही मिळून जातात. मात्र, कित्येक दिवस अन महिने लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसल्याचा प्रकार कित्येकदा घडला आहे. मात्र, यंदा हा प्रकार घडू नये यासाठी राज्य शासनाने गणवेश योजनेकरिता अनुदान वितरित केले आहे. त्यानुसार, जिल्ह्याला ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांसाठी चार कोटी ४९ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. निधी जिल्ह्यातील १,०६५ हा विभागाकडून तालुकास्तरावर व्यवस्थापन गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात आला असून, तेथून शाळा

समग्र शिक्षा अभियानाकडून जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व मुली व मागासवर्गीय मुलांना दरवर्षी दोन जोड गणवेश दिले जात असून, यासाठी प्रती गणवेश ३०० रुपयांप्रमाणे ६०० रुपये दिले जातात. त्यात आता गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले असल्याने शाळा समित्यांना तालुकास्तरावरून हा निधी वितरित केला जाणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share