जिल्हातील 1371 शाळांचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजनेत सहभाग

गोंदिया: स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशात स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 1617 शाळांनी उपक्रमात नोंदणी केली होती. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पथकांमार्फत शाळांची गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. सर्वाधिक गुणांकण प्राप्त 38 शाळांची जिल्हास्तरावर निवड करण्यात येणार असून यातील 14 शाळांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात येणार आहे.

स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत जिल्ह्यातील 1663 शाळांपैकी 1371 शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शाळांनी स्वच्छ विद्यालय पोर्टलवर त्यांच्या आवारातील पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, हात धुणे, देखभाल, भौतिक सुविधा आणि कोरोना संदर्भातील सुरक्षितता यासंदर्भातील 59 प्रश्न आभासी अर्जामध्ये स्वमूल्यांकन करून भरले. शाळांनी भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या नेतृत्वाखाली 9 ते 15 मेपर्यंत शाळा तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत गोंदिया तालुक्यातील 304, आमगाव 112, अर्जनी मोर133, देवरी 172, गोरेगाव 128, सडक अर्जुनी 126, सालेकसा 97 आणि तिरोडा तालुक्यातील 117 अशा 1242 शाळांची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. निवड झालेल्या शाळांना पुरस्कार वरिष्ठ स्तरावर दिले जातील. अशी माहिती या उपक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी बाळकृष्ण बिसेन यांनी दिली.

स्वच्छ विद्यालयात शहरी भागातील शाळांबरोबरच ग्रामीण भागातील शाळांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ग्रामीण आणि शहरी भागातील 38 शाळांची निवड करण्यात येणार आहे. समाजात तसेच शाळांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व वाढावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share