देवरी येथील क्रीडासंकुलात भव्य ओपन बॅडमिंटन स्पर्धा संपन्न , प्रथम आरिफ खान तर द्वितीय मिहीर शर्मा

◼️उत्सहात पार पडली बॅडमिंटन स्पर्धा

देवरी 09: आरिफ बॅडमिंटन अकेडमी देवरी आणि बँडमिंटन प्रायोजक मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने दि. 09 मे रोजी बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षिसे वितरण क्रीडासंकुल ज़िल्हा परिषद क्रीडांगण येथे करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेमध्ये क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांचे कडून 11000 रुपयाचे प्रथम पारितोषिक आणि आरिफ बॅडमिंटन अकेडमी देवरी तर्फे 7000 रुपयाचे द्वितीय पारितोषिक होते.
सदर स्पर्धेत प्रथम आरिफ खान आणि द्वितीय मिहीर शर्मा यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे आणि रोख रक्कम देण्यात आली.यावेळी अर्चना अग्रवाल , श्रीमती बंग , योगेश बंग यांच्या सह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share