शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यासाठी अपर तहसीलदार यांना निवेदन

अपर तहसीलदार कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसच्या वतीने नारेबाजी आंदोलन करीत अपर तहसीलदार चिचगड यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने कॉर्पोरेट आणि मोठ्या उद्योजकांना, धनदांडग्या व्यापाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि मित्रपक्षाचाही विश्वासघात करुन देशात भ्रामक वातावरण निर्माण करीत घाईघाईने ही तिनही विधेयके संसदेत केवळ आवाजी मताने मंजूर करुन घेतली. यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या ०८ डिसेंबरला बंदला पाठिंबा म्हणुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

प्रहार टाईम्स
(प्रतिनिधी)
देवरी 8: शेतीसंबंधीत तीन विधेयके संसदेत मंजूर करण्यात आली असून ही तिनही अधिनियमाच्या अनुषंगाने केलेल्या सुधारणा पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. या कायद्याच्या बदलाने देशातील सर्व सामान्य ९० टक्के एक हेक्टर पेक्षा कमी जमीन असेलेला शेतकरी आणि ४० टक्के शेती नसलेले शेतकरी असून या विधेयकांमुळे गरीब मजुरांच्या जिवनातील अडचणींत वाढ होणार आहे.

केंद्र शासनाने कॉर्पोरेट आणि मोठ्या उद्योजकांना, धनदांडग्या व्यापाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि मित्रपक्षाचाही विश्वासघात करुन देशात भ्रामक वातावरण निर्माण करीत घाईघाईने ही तिनही विधेयके संसदेत केवळ आवाजी मताने मंजूर करुन घेतली. या तिन्ही कायद्यामध्ये कुठेही उत्पादन खर्चापेक्षा किमान ५० टक्के अधिक हमीभाव देण्याचा उल्लेख केलेला नाही.या विधेयकात बाजार समित्या नष्ट करुन सरकारचे शेती उत्पादनाच्या खरेदी,विक्रीचे शेतकऱ्यांचे संरक्षण कवच काढून टाकणे, अन्नधान्य व आवश्यक शेती उत्पादनाची सरकारी खरेदी थांबविणे, अत्यावश्यक वस्तू कायद्यातील खाद्यतेल, बटाटे, कांदे,डाळी, अमर्याद साठ्यांचे निर्बंध काढून खासगीकरण करणे असे या विधेयकानुसार होणार आहे. हे शेतकरी विरोधी असून सरकारने शेतमालाला किफायतशीर हमीभाव आणि शेतकरी कर्जमुक्ती विधेयकांचा समावेश असलेली विधेयकही मंजूर करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यापेक्षा त्याचा कायद्यात सहभाग करावा,ग्रामीण कष्टकरी, शेतकरी, मजुरांच्या विरोधी पारीत केलवेली तिन्ही विधेयके रद्द करण्यात यावी, मोटारसायकल रॅली काढून नारेबाजी करण्यात आली. व अपर तहसीलदार चिचगड यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते इंदल अरकरा काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सचिव मोतीलाल पिहदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम साखरे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते भुपेन्द्र मस्के, माधुरी शहारे, देवेन्द्र घोटे, काॅग्रेसचे नेते घसरण धरमगुडे, नसरू बंदेअली, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिचगड सर्कलचे नेते बबलु खान, भिकाजी भोयर, चैनसिंग मडावी, जनकलाल राऊत, कुमारसाय ताराम, देवराज कुंभरे, वैशाली नरेटी, वासुदेव राऊत, खुशाल चंदणबटवे, यशवंतआचले, विजय वालदे, दिनेश अंबादे , अजय वालदे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Print Friendly, PDF & Email
Share