उद्या पहाटे भागी येथे शासकीय इतमात होणार जवानाच्या पार्थिव शरीरावर अंतिमसंस्कार

◾️मोटार सायकल अपघातात गमावला जीव

देवरी 12: तालुक्यातील भागी या गावातील विजय उईके जवान , आईआरबी गटबल 15 विरशी कॅम्प गोंदिया येथे कार्यरत होता. साप्ताहिक सुट्टीवर देवरी येथील भागी गावात काल (11) आला होता. कुटुंबासोबत काही क्षण साजरे करून आज आपल्या कर्तव्यावर हजर राहण्याकरिता मोटार सायकलनी निघाला असता आमगाव देवरी रोड वर स्थित अंजोरा गावाजवळ त्याचा अपघात झाला असून तो मृत स्थितीत आढळला.

त्यांचे पार्थिव शरीर देवरी / भागी येथे आणण्यात आले असून उद्या सकाळी 6 वाजता शासकीय इतमात जवानांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार होणार आहे. सदर घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली असून देवरी तालुक्याने आपले 2 वीरपुत्र गमावलेले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share