भाजप विद्यार्थी मोर्चाद्वारे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

देवरी 12 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिना पासून पुढील दोन आठवडे महाराष्ट्र राज्य भाजप तर्फे मागील सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रमासह सेवा सप्ताह आयोजीत केला होता. या सेवा सप्ताह निमित्त देवरी तालुका भाजप विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नमो प्रश्न मंजुषा स्पर्धा परीक्षा आयोजीत केली होती.
या स्पर्धा परिक्षेत तालुक्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि सिद्धार्थ हायस्कूल डवकी या दोन्ही शाळेतून एकूण नऊशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता, हे विशेष. यात स्पर्धा परिक्षेला बसलेल्या प्रत्येक वर्गातून गुणानुक्रमे तीन क्रमांक काढून सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना ११ फेब्रुवारीला प्रशस्तीपत्र देऊन सत्कार माजी आमदार संजय पुराम, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, प्राचार्य महेंद्र मेश्राम, मनोज भुरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू , सदस्य माजीद खान, युवा तालुकाध्यक्ष छोटू भाटीया, महामंत्री मनोज मिरी, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष इमरान खान, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दिपक शाहू , पियुष दखने, सचिव आकाश नेताम, कोषाध्यक्ष राहुल मडावी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share