गोंदियाचे नवे डीएचओ डॉ.नितिन वानखेडे तर भंडाराचे नवे डीएचओ डॉ. शामकुंवर

गोंदिया: गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी पद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते.त्या रिक्तपदावर सार्वजनिक आरोग्य विभागाने पदोन्नती व प्रशासकीय बदल्याच्या माध्यमातून भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.नितिन सोपानराव वानखेडे यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर बदली केली आहे.त्यासोबतच गोंदिया येथील सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कुष्ठरोग) डॉ. रामेश्वर जनार्दन पराडकर यांची वर्धा जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने शुक्रवारला काढलेल्या आदेशात 16 आरोग्य अधिकारी यांची बदली प्रशासकीय व पदोन्नतीतून केली आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर चंद्रपूर येथील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.मिलिंद सोमकुवर यांची बदली केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share