नगरपंचायत देवरीवर कमळ फुलला, घड्याळ बिघडली आणि पंज्याचा गणित बिघडला

◾️जाणून घ्या तुमच्या प्रभागातील नवीन नगरसेवकाबद्दल

डॉ. सुजित टेटे
देवरी 20: स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्हातील 3 नगरपंचायतीचे काल निकाल लागले. यामध्ये देवरी नगरपंचायतीवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळविला असून 17 पैकी 11 जागांवर कमळ फुलला आहे. काँग्रेस ला 4 जागा तर राष्ट्रवादीला 2 जागांवर समाधान मानावे लागले.

देवरी नगर पंचायतीवर 17 जागांसाठी अनेक दिग्गजांनी निवडणूक लढविली परंतु जनता जनार्धनानी यावेळी दिग्गजांना आपला नेता म्हणून स्पष्ट नाकारल्याचे दिसले. प्रभाग क्रमांक 2, 7, 8, आणि 11 च्या माजी नगरसेवकांना जनतेनी यावेळी नाकारल्याचे चित्र बघावयास मिळाले.

नगर पंचायत देवरी निवडणुक २०२१-२२ च्या प्रभागांनुसार सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

प्रभाग -1
ऊईके शारदाबाई उदेराम( 116)
कुंभरे कौशल्याबाई नारायणजी (279)( भाजप )
मडावी निर्मला गोपाल (131 )
NOTA-16

कुंभरे कौशल्याबाई नारायणजी

माजी नगराध्यक्षा कौशल्याबाई कुंभरे यांनी 163 मतांनी घवघवीत विजय मिळवत विजय जल्लोष साजरा केला. याआधी त्या नगरपंचायत देवरी च्या नगराध्यक्षा होत्या.

प्रभाग 2:
गाढवे संध्या रमेश ( 22)
तिवारी उषा गोपाल (122 )
दहिकर वनिता प्रविण ( 85 )
शाहू सुनीता ओंकार (171 ) काँग्रेस
NOTA-6

शाहू सुनीता ओंकार


या प्रभागामध्ये माजी नगरसेवक प्रवीण दहीकार यांनी प्राण प्रतिष्ठा पणास लागली होती. परंतु प्रभागाबाहेरून निवडणुकीत रिंगणात असलेले सुनीता ओंकार शाहू (काँग्रेस) 49 मतांनी या नवख्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविलेला आहे.

प्रभाग 3
ममता आनंदगीरी ओंकारी ( 172 )
पिल्लेवार स्मिता राकेशराव( 20 )
संगीडवार प्रज्ञा प्रमोद (284 )भाजप


या प्रभागामध्ये भाजपच्या प्रज्ञा संगीडवार यांनी 112 मतांनी दणदणीत विजय मिळविलेला आहे.

प्रभाग 4:
अग्रवाल रितेश सुरेश (305) भाजप
गोडशेलवार दिनेश नामदेवराव ( 105 )
वाडगुरे मनोजकुमार लक्ष्मण(91)
NOTA-6

अग्रवाल रितेश सुरेश

या प्रभागात भाजपचे माजी नगरसेवक रितेश अग्रवाल यांनी दुसऱ्यांदा आपली जागा कायम राखत 200 मतांनी दणदणीत विजय मिळविलेला आहे.

प्रभाग 5:
उईके प्रीती विकास ( 49 )
चांदेवार पारबताबाई भैय्यालाल(181 )
बळगये दिपीका संजयकुमार (178 )
भेलावे तणुजा दिनेश (199)

भेलावे तणुजा दिनेश

या प्रभागात याआधी भाजपच्या नगरसेविका असलेल्या भेलावे यांच्या सुनबाई तनुजा भेलावे यांना 18 मतांनी विजय मिळाला असून प्रभागात भाजप चा कमल फुललेला दिसला. या प्रभागात राष्ट्रवादीच्या माजी जिप सदस्य पारबता चांदेवार यांची घड्याळ चालली नाही.

प्रभाग 6
उईके संजू शेसलाल (156 )भाजप
चनाप कुवरलाल नारायण ( 118 )
मानकर मधुकर मणीरामजी ( 53 )
राऊत दिलीप रामचंद्र ( 56 )

माजी नगरसेवक संजू उईके यांनी 38 मतांनी विजय मिळविला.

प्रभाग 7
खान अमानउल्लाह शरीफउल्लाह ( 42 )
तिवारी संतोषकुमार दामोदरप्रसाद ( 182 )
पांडे शैलेश राजनारायण ( 25 )
भाटिया सरबजितसिंग प्रितमसिंग (204 ) काँग्रेस
शाहू रामनरेश महावीर ( 21)

भाटिया सरबजितसिंग प्रितमसिंग

भाजपचे अनुभवी दिग्गज नेते तसेच माजी नगरसेवक संतोष तिवारी यांचा काँग्रेसचा नवा तरुण चेहरा सरबजितसिंग ( शॅकी ) भाटिया यांनी 22 मतांनी पराभव केला असून भाजपचा कमल यावेळी कोलमेजलेला दिसला.

प्रभाग 8:
बिसेन सुमन छोटेलाल( 198 )
भाटिया जतींदरसिंग अजितसिंग ( 47 )
शेख आफताब अलताफ (397 ) भाजप

सदर प्रभागात राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा सुमन बिसेन आणि भाजपचे माजी उपाध्यक्ष आफताब शेख यांची प्राणप्रतिष्ठा पणास लागलेली होती. यामध्ये भाजपचे आफताब शेख यांनी 199 मतांनी दणदणीत विजय मिळविलेला आहे.

प्रभाग 9:
जनबंधु कांचन ज्ञानेश्वर ( 16)
तरजुले शकुंतला रतन ( 27)
मेश्राम कमल देवानंद ( 289) भाजप
मेश्राम लक्ष्मी योगेश( 95)
राऊत मिना रविंद्र ( 59)
राऊत वंदना सतीश ( 23)
रामटेके निलेशा उत्तम ( 16)

सदर प्रभागात सर्वच नवीन चेहरे असतांना भाजपच्या कमल मेश्राम यांचा 194 मतांनी विजय झाला.

प्रभाग 10:
झिगरे लताबाई लक्ष्मण ( 104)
टेंभरे हिना कैलाश ( 143) राका
नंदनवार मिराबाई सिध्दार्थ ( 07)
नेवरगडे रजनी छुन्नु ( 16)
पारधी त्रिवेणी रमेश ( 92)
लाडे रुपा हेमराज ( 49)
Nota-07

टेंभरे हिना कैलाश

या प्रभागात देखील राजकारणातील नवीन चेहरे बघावयास मिळाले यामध्ये देवरी नगरपंचायतीत राष्ट्रवादीने पहिला खाता उघडायचे दिसले. राष्ट्रवादीच्या हिना टेंभरे यांनी 39 मतांनी विजयाचा शिक्का मोर्तब केला.

प्रभाग 11:
दरवडे संजय रतीराम ( 192) भाजप
फुत्रे महेश शिवलाल ( 112)
रामटेके ओमप्रकाश श्रावण( 82)
शर्मा निखिल अनिल ( 15)
शाहू निलेश रामचंद ( 71)

दरवडे संजय रतीराम

सदर प्रभाग काँग्रेसचे माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके यांचा गड होता परंतु भाजपचे संजय दरवडे यांनी 80 मतांनी विजय मिळवून भाजप चा कमळ फुलविला आहे.

प्रभाग 12:
इलमकर सुनिता रामदास ( 15)
खरोले कोमल मुकेश ( 130)
टेंभुरकर तारा उत्तम ( 68)
राऊत सलमा विलास ( 05)
रंगारी सिता प्रकाश ( 351) भाजप

नगर पंचायत देवरी येथे प्रभाग 12 चर्चेचा विषय ठरला यामध्ये साधी राहणीमानासाठी ओळख असलेल्या भाजपच्या माजी नगर सेविका सीता रंगारी यांचा 221 मतांनी विजय झाला.

प्रभाग 13
कुरेशी इलीयाज इकबाल ( 112 )
चोपकर कृष्णदास संपतराव( 188 )
टेंभूनिकर रुपेशकुमार हरिदास ( 3 )
डोंगरे मोहन भिवा (231 ) काँग्रेस
देशपांडे सुबोध पुरुषोत्तम ( 62 )
वाघमारे तुकाराम दादुजी (9)

डोंगरे मोहन भिवा

या प्रभागात काँग्रेस चे नवीन उमेदवार मोहन डोंगरे यांचा 43 मतांनी विजय झाला असून भाजपचे कृष्णदास चोपकर यांचा पराभव झालेला आहे.

प्रभाग 14
पृथ्वीराज नंदेश्वर ( 36)
नितीन मेश्राम ( 194) काँग्रेस
सूकचंद राऊत (137 )
कृष्णा राखडे ( 28 )
अरविंद शेंडे ( 172 )

नितीन मेश्राम

या प्रभागात काँग्रेस चे नवीन उमेदवार नितीन मेश्राम यांचा 22 मतांनी विजय झाला.

प्रभाग 15:
कटकवार पिंकी पारस (327 ) भाजप
कुर्वे करुणा अनिल ( 92 )
बावनथडे रीना विजय (58 )
मस्के कमलाबाई उमेश ( 35 )
NOTA-6

कटकवार पिंकी पारस

सदर प्रभागात भाजपचे पिंकी कटकवार यांचा सर्वाधिक 235 मतांनी विजय झाला असून देवरी नगर पंचायतीत नवीन रेकॉर्ड तयार झाला आहे.

प्रभाग 16
कुंभरे मिना नरेश ( 45 )
नेताम प्रीती सदानंद (147 )
मडावी छाया हरिशचंद्र ( 119 )
सयाम नुतन अमरलाल( 173 ) भाजप

सयाम नुतन अमरलाल

सदर प्रभागात भाजपचे नूतन कोवे यांचा 26 मतांनी विजय झाला प्रभागात शिवसेना च्या प्रीती नेताम आणि भाजप मध्ये लढत होती.

प्रभाग 17:
कानेकर चंद्रकांत सुरेंद्र ( 21 )
कोटांगले प्रशांत भाष्कर ( 89 )
जांभूळकर सुनीता फत्तु ( 58 )
नंदेश्वर संदीप शामराव ( 4 )
शहारे पंकज हरीकीसन ( 189 ) राका
शिंदे विलास गजानन ( 154 )

शहारे पंकज हरीकीसन

या प्रभागात देखील राजकारणातील नवीन चेहरे बघावयास मिळाले यामध्ये देवरी नगरपंचायतीत राष्ट्रवादीने दुसरा खाता उघडल्याचे दिसले. राष्ट्रवादीचे पंकज सहारे यांनी 35 मतांनी विजयाचा शिक्का मोर्तब केला. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनु. जाती आघाडी चे विलास शिंदे यांची प्रतिष्ठा या प्रभागात पणास लागलेली होती. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

दिग्गजांचे समीकरण बिघडले:

अनेक अनुभवी दिग्गजांनी देवरी नगरपंचायतीवर आपले नशीब आजमावले, मतांची बेरीज वजाबाकी आणि न सुटणारे समीकरणांची जुडवाजुडव करीत आपला विजय पक्का असे स्वप्न रंगविले असतांना मतदारांनी अंतिम खेळ खेळल्याचे स्पष्ट होते.

Print Friendly, PDF & Email
Share