भजेपार येथील इसम 17 दिवसांपासुन बेपत्ता

सालेकसा: तालुक्यातील भजेपार निवासी गुनेश्र्वर ऊर्फ अविनाश जगन्नाथ बहेकार ( वय वर्ष 48) हा इसम 29 डिसेंबर पासून बेपत्ता आहे. या संदर्भात कुटुंबीयांनी आमगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस आणि कुटुंबीय शोध घेत आहेत. मागील 17 दिवसांपासुन पत्ता लागला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुनेश्र्वर हे मागील 15 ते 20 वर्षापासून नागपूर येथे इलेक्ट्रिक चे काम करत होते. दरम्यान 29 डिसेंबर रोजी त्यांनी नागपूर वरून आमगाव ला येत असल्याची माहिती फोन वरून मित्र आणि नातलगांना दिली होती. परंतु ते घरी पोहचले नाही. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद पडला. उंची 5.6 इंच आणि वर्ण गोरा असून ही व्यक्ती कुठे आढळून आल्यास सेवकराम बहेकार 9284411286, संजय शिवणकर 9922238927, चंद्रकुमार बहेकार 7588880794, नंदकिशोर कठाने 8265080299, नंदकिशोर बहेकार 8390217990, योगेश बहेकार 9823208500, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share