डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने आमदार सहसराम कोरोटे सन्मानित

लॉकडाऊन काळातील उत्कृष्ट कामाची बुध्दांजली फाउंडेशन ने घेतली दखल

डॉ. सुजित टेटे / प्रहार टाईम्स

देवरी 27: आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रांचे आमदार सहसराम कोरोटे नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बुध्दांजली फाऊंडेशनच्या वतीने कोरोना लॉकडाऊन काळात उत्कृष्ट कामगिरी करून आमदार सहसराम कोरोटे या पुरस्काराचे मानकरी ठरले असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
आमदार कोरोटे यांनी केलेल्या कार्याची दखल मुंबई च्या बुध्दांजली फाऊंडेशन ने घेतली असून नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करून मानाचा तुरा रोवला आले.
यावेळी आमदार कोरोटे यांनी आपल्या पक्षाचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share