सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; दिवाळीत सोनं मिळणार स्वस्तात!

मुंबई: कोरोनाकाळात सोनं-चांदीच्या किंमतीने सर्वोच्च उच्चांक गाठत आतापर्यंतचे किंमतीचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्यातच मागच्या दिवाळीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोनं स्वस्त होईल, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर दिवाळीत उत्तम संधी असल्याचंही बोललं जात आहे.

मागच्या वर्षी दिवाळीत सोन्याचा दर हा 51 हजार रुपये प्रति तोळा एवढा होता. आता तोच दर खाली उतरून 47 हजार रुपये प्रति तोळा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याला उत्तम गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. त्यातच दसऱ्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत असताना पाहायला मिळाल्या.

सोन्याच्या या वाढत्या किंमती कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोनं गुंतवणूकीचा उत्तम पर्याय जरी असेल तरी आता सांभाळणं ही एक मोठी जोखमीची जबाबदारी आहे. त्याला पर्याय म्हणून आता गुगल-पे, अमेझाॅन आणि पेटीएम अशा कंपन्यांनी पुढाकार घेत ऑनलाईन सोनं खरेदी आणि साठवणूकीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दिवाळीत आता या किंमती कमी होणार का? आणि सर्वसामान्यांना सोनं खरेदीसाठी दिलासा मिळणार का?, य़ाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share