सणासुदीत स्वदेशी वस्तूच खरेदी करा- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: आगामी सणासुदीत फक्त स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करा. आत्मनिर्भर भारत अभियानाला बळकटी देण्यासाठी स्वदेशी वस्तूंवरच प्रत्येकाचा भर असायला हवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केले. ‘मेक इन इंडिया’चा पाया रचताना पंतप्रधान देशवासीयांना संबोधित होते. पंतप्रधान म्हणाले की, एकेकाळी विदेशी वस्तूंचे फार जास्त आकर्षण होते. आज ‘मेड इन इंडिया’ची शक्ती खूप वाढली आहे. आपल्याच देशात तयार झालेल्या वस्तूंच्या खरेदीचा आपला आग‘ह असायला हवा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान मोदी यांनी देशाचा विकास आणि नागरिकांना फायदा व्हावा, या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या. या अंतर्गत त्यांनी ‘मेक इन इंडिया’ अभियानाचा पाया रचला. पंतप्रधानांनी त्यांच्या पहिल्या कारकीर्दीच्या सुरुवातीस ‘मेक इन इंडिया’ अभियान सुरू केले होते. यावेळी ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ म्हणजे ज्या वस्तू फक्त आपल्या देशात तयार झाल्या आहेत. सर्व वस्तू आपल्या देशात तयार करण्यात आल्या, तर त्या वस्तूंची किंमत कमी होईल; कारण जेव्हा कोणताही माल बाहेरून आयात केला जातो, तेव्हा त्यावर लावलेल्या करांमुळे ती वस्तू महाग होते. तिथेच वस्तूंची निर्मिती आपल्याच देशात करण्यात आली, तर इतर देशांना आपण निर्यात करण्याची शक्यता वाढेल आणि आपल्या देशाचे उत्पन्न वाढेल. यामुळे देशातील तरुणांना रोजगारही मिळेल.

तीन हजार कंपन्यांना जोडणार

‘मेक इन इंडिया’ अभियानात सुमारे तीन हजार कंपन्यांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळेल आणि देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होईल तसेच विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

‘मेक इन इंडिया’चे उद्दिष्ट

– उत्पादन क्षेत्रात वार्षिक 12 ते 14 टक्के वाढ करणे

– 2022 पर्यंत उत्पादनाचा हिस्सा जीडीपीच्या 16 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढविणे

– अधिकाधिक विदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे

– 2022 पर्यंत भारतात सर्व वस्तूंचे उत्पादन सुरू करणे

– भारतात गुंतवणूक करणार्‍या विदेशी कंपन्यांद्वारे रोजगार निर्माण करणे

– देशातच प्रत्येक वस्तू तयार करून अर्थव्यवस्था बळकट करणे

– नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि उद्योजक क्षमता वाढविणे

25 प्राधान्य क्षेत्रांची ओळख निश्चित

‘मेक इन इंडिया’ अभियानासाठी सरकारने 25 प्राधान्य क्षेत्रांची ओळख निश्चित केली आहे. या क्षेत्रांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे आणि केंद्र सरकारकडूनही गुंतवणूक वाढविली जाईल. वाहन, ऑटोमोबाईल, विमानचालन, जैवतंत्रज्ञान, रसायने, बांधकाम, संरक्षण उत्पादन, विद्युत यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, अन्न प्रकि‘या, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रकि‘या व्यवस्थापन, चामडे, मीडिया आणि मनोरंजन, खनिजे, तेल आणि वायू, फार्मास्युटिकल्स, बंदरे आणि शिपिंग, रेल्वे, अक्षय ऊर्जा, रस्ते आणि महामार्ग, अवकाश आणि खगोलशास्त्र, कापड, औष्णिक ऊर्जा, पर्यटन आणि आतिथ्य, कल्याण या क्षेत्रांचा यात समावेश आहे.

Print Friendly, PDF & Email
Share