Good News: 6 मुलांच्या कोरोना लसीची चाचणी यशस्वी

मुंबई: राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, लसीकरणाबाबत एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये 6 मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी ट्रायल घेण्यात आली असून, 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना हि कोरोना लस देण्यात आली. लसीकरणानंतर त्यांच्यावर कोणतेही परिणाम दिसून आलेले नसल्यामुळे आता मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीसाठी नोंदणी सुरूच आहे. कोरोना लसीची चाचणी घेण्याची परवानगी केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली. त्यानुसार नायर हॉस्पिटलमध्ये सहा मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी ट्रायल झाली.12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर लसीची ट्रायल घेण्यात आली होती. केवळ 4 दिवसात ही ट्रायल घेण्यात आली आहे. या चाचणीबाबत पालक – मुलांनी यासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुंबई महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.

सुरूवातीला कोरोना प्रतिबंधात्मक लस 60 वर्षांवरील व्यक्तींना देण्यात आली. त्यानंतर 45 वय वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सरकारने परवानगी दिली. त्यानंतर 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर 18 वर्षांवरील तरूणांना लस देण्यास मंजूरी दिली. 12 ऑक्टोबरला 2021 रोजी 2 ते 18 वय वर्ष गटातील मुलांना लस देण्यास परवानगी दिल्यानुसार मुंबईमध्ये लहान मुलांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share