भव्य निशुल्क नेत्ररोग निदान शिबिर व चश्मा वाटपाचे यशस्वी आयोजन.

लायंस क्लब व सहयोग नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यामानाने देवरी येथे कार्यक्रमाचे आयोजन या शिबिरात एकूण ३८६ लोकांची नेत्र तपासणी व १९५ लोकांना मोफत चष्मे वाटप

देवरी 08: लायंस क्लब देवरी व सहयोग नेत्रालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने देवरी येथे भव्य निशुल्क नेत्ररोग निदान शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बुधवारी(ता.६ ऑक्टोम्बर) रोजी करण्यात आले होते.
या नेत्ररोग निदान शिबिराचे उदघाटन लायंस क्लब देवरीचे अध्यक्ष पारस कटकवार, माजी नगरसेवक यादोराव पंचमवार, क्लबच्या झोन चेयर पर्सन पिंकी कटकवार यांच्या हस्ते पार पडले.

या शिबिरात एकूण ३८६ लोकांच्या डोळ्याची तपासणी करून त्यापैकी १९५ लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच एकूण ८६ लोकांच्या डोळ्यात मोतीयाबिंदू असल्याने येत्या काही दिवसात त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती क्लब चे अध्यक्ष पारस कटकवार यांनी यावेळी दिली.
या शिबिरच्या आयोजनार्थ लायंस क्लब चे अध्यक्ष पारस कटकवार, सचिव आफताब शेख उर्फ अन्नू भाई, कोषाध्यक्ष हमीद मेमन, झोन चेअर पर्सन पिंकी कटकवार, कॅबिनेट ऑफिसर चरणजीतकौर भाटिया, सदस्य पुष्पा नळपते, मनोज मेश्राम, अनिल मेश्राम, पूजा गहाणे, सुमनताई बिसेन, ज्योती रामटेककर, विजय पाटील, अमृतपालकौर भाटिया, हेमचंद रामटेककर, लक्ष्मीताई पंचमवार, सुधा अग्रवाल,संगीताताई पाटील शबना हमीद मेमन, निलोफर आफताब शेख आणि लियो क्लब देवरीचे अध्यक्ष वाजीद मेमन, सचिव लारैब शेख, कोषाध्यक्ष आकाश भेंडारकर, सदस्य अरशद शेख, मुजीब मेमन, शार्दूल मेश्राम, जीन सलूजा, तौशिक शेख, मोहित सोनसर्वे, मोहित झिंगरे, राम गुप्ता, नावेद पठाण, पवन ठाकूर, राजदीप भाटिया, रिषभ जैन, शाहिल पठान,शाहिल शेख, वाहिद खान, शैफ शेख तसेच सहयोग नेत्रालय गोंदियाचे डॉ. प्रवीण बहेकार, डॉ.मोहित गजभिये व अमित सांगोळे आदींनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share