राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर

देवरी 03: राष्ट्रीय नेते खा.प्रफुल्लभाई पटेल व आ. राजेंद्र जी जैन यांच्या विचारातून प्रेरणा घेवुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .2 आँक्टोंबर शनिवार ला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवरी च्या मार्गदर्शनाखाली जि.प.क्षेत्र चिचगड च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटो पुजन व दिपप्रज्वलन रमेशजी ताराम सभापती, शरदजी पाटील ,ठाणेदार चिचगड यांच्या हस्ते सि.के.बिसेन तालुकाध्यक्ष, गोपालजी तिवारी ,जिल्हाउपाध्यक्ष योगेशकुमार देशमुख, तालुकाध्यक्ष युवा , भैयालाल चांदेवार संचालक व दिलीप दुरूगकर उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
रक्तदान शिबिरात एकुण ५७ दानदात्यांनी रक्तदान केले. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गावोगावी जाऊन रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवून रक्तदान करावयास लावले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प. चिचगड क्षेत्रातील योगेशकुमार देशमुख तालुकाध्यक्ष युवा, इंदल अरकरा माजी उपसभापती , माधुरी शहारे युवती तालुकाध्यक्ष, बबलुभाई खान तालुकाध्यक्ष, अल्पसंख्याक सेल,राजेशभाऊ बिंझलेकर , देवेंद्र घोटे , यादवराव शहारे , महेंद्र निकोडे,भोजसींग कछ्यप , बबलूजी भाटिया, मनोज गौर, रोशन परिहार , महादेव श्यामकुवर, छगन अंबादे , धनराज बावणथडे व क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share