बिरसी विमानतळावर प्लेन झाले हायजॅक !!

◾️ॲन्टी-हायजॅक मॉक एक्सरसाइज कार्यक्रम

गुरुवारी सकाळी ११ वाजता वेळ, बिरसी विमानतळावर बाहेरून एक विमान उतरते, त्यानंतर काही क्षणांतच प्लेन हायजॅक झाल्याची वार्ता येते आणि विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेची धावपळ सुरू होते. यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या जातात. विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचीधावपळ सुरू होते. काय सुरू आहे विमानतळावर उपस्थित प्रवाशांनासुद्धा काही कळत नाही. दरम्यान, सुरक्षा यंत्रणा परिस्थिती यशस्वीपणे हाताळते आणि प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढते आणि सारेच सुटकेचा निश्वास सोडतात.
तालुक्यातील बिरसी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात होणार आहे. सध्या या विमानातळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली नसली तरी या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस विमानतळावर आपात्कालीन घटना घडल्यास त्याचे नियोजन कसे करायचे, सुरक्षा आणि विमानतळ यंत्रणा त्याची वेळीच हाताळणी कशी करेल याची रंगीत तालीम घेण्यात आली. ॲन्टी-हायजॅक माॅक एक्सरसाइज कार्यक्रम घेण्यात आला. बिरसी विमानतळ येथे ॲन्टी-हायजॅक माॅक एक्सरसाइज कार्यक्रम गुरुवारी (दि.२९) आयोजित करण्यात आला. यावेळी बिरसी विमानतळ समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी नयना गुंडे, संयोजक बिरसी विमानतळचे संचालक बैजू के.वी., सदस्य पोलीस अधीक्षक पानसरे, बिरसी विमानतळाचे सहायक महाप्रबंधक विनय ताम्रकार, मुख्य सुरक्षा अधिकारी मिलेन्द्र नीरमालकर, एयरपोर्ट टर्मिनल व्यवस्थापक इंडियन ऑइलचे वसंत पारडीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव, रावणवाडीचे ठाणेदार उदयराज डमाले, बिरसी विमानतळाचे प्रभारी सहायक निरीक्षक गणपत धायगुडे, एनएफटीआई व इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान ॲकॅडमी व बिरसी विमानतळ कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share