आता शेतकऱ्यांना मिळणार 2 ऐवजी 4 हजार रुपये

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6000 रुपये पाठवले आहेत. या योजनेशी संबंधित एक मोठी बातमी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवलेली रक्कम दुप्पट करण्याचा सरकारचा विचार आहे. ज्यात या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 2000 रुपयांच्या हप्त्याऐवजी 4000 रुपयांचा हप्ता मिळेल. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करावी.

आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये हंस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. 30 सप्टेंबरपूर्वी करा रजिस्ट्रेशन जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरी देखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर अजूनही तुम्ही नोंदणी करून हा हप्ता मिळवू शकता. जारी होणाऱ्या पुढील हप्त्यासह तुम्हाला आधीच्या हप्त्याची रक्कमही मिळेल, अर्थात तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील. मात्र तुम्हाला याकरता 30 सप्टेंबरपूर्वी योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला हे काम पूर्ण करावं लागेल. तुमचा अर्ज स्विकार झाल्यास तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आणि डिसेंबर महिन्यात पुढील महिन्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळतील.

या योजनेत नोंदणी करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmkisan.gov.in/registrationform.aspx ला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला त्यात ‘फार्मर्स कॉर्नर’चा पर्याय दिसेल. जिथे तुम्हाला लाभार्थी स्थितीचा पर्याय दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल. यानंतर, या नवीन विंडोमध्ये, तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडून तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण तपशील भरावा लागेल, भरल्यानंतर तुम्हाला Get Data वर क्लिक करावे लागेल. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्यांची सर्व माहिती मिळू शकेल.

Print Friendly, PDF & Email
Share