जिल्हातील 6 तालुके झाली कोरोनामुक्त

◾️गोंदिया आणि आमगाव तालुक्यातच कोरोनाचे एकूण सात ॲक्टिव्ह रुग्ण

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून, गोंदिया आणि आमगाव तालुक्यातच कोरोनाचे एकूण सात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी १४५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ७५ जणांची आरटीपीसीआर, तर ७० जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,५२,६३१ जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,३२,०१२ जणांची आरटीपीसीआर, तर २,२०,६१९ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,२२० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, ४०,५०६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share