अल्पवयीन मुलीवर बळजबरी : ७ महिन्याच्या गर्भवती मुलीने बदनामीच्या भीतीने गळफास घेत केली आत्महत्या

अमरावती : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचे नाव घेताना नसत दिसल्याचे चित्र आहे. अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर बळजबरी केली. यानंतर ती मुलगी गर्भवती राहिली. अखेर 7 महिन्यांची गर्भवती असताना भीतीपोटी संबंधित मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. येवदा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी तपास सुरु आहे. अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. पुन्हा एकदा दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्ष होते. यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती असताना बदनामीच्या भीती पोटी तिने स्वतः ला गळफास लावून घेतले. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळवल्यानंतर येवदा पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. तर, पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करत आहेत. अमरावतीच्या येवदा पोलिसांनी या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. येवदा पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
लग्नाला विरोध केल्याने मुलीच्या आईलाच संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे घडली आहे. याघटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव लता परीट असे आहे. तर, आजरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या आल्याचीवाडी इथे घटना धक्कादायक घटना घडली आहे. लता परीट या शेतात कामासाठी गेल्या असता तिथे त्यांचा खून करण्यात आला आहे. आजरा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र फिरवत आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला अटक केली असून तपास सुरु आहे. आजरा पोलिसांनी आरोपी गुरुप्रसाद माडभगत याच्याकडं चौकशी केली असता त्याने परीट यांनी त्यांच्या मुलीसाठी लग्नाचा दिलेला प्रस्ताव नाकारल्याने माडभगत यांने हल्ला केला. माडभगत लता परीट यांचा खुरप्याने हल्ला करुन खून केल्याचे समोर आले आहे. आजरा पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share