पेंग्वीनसाठी काढले जाणारे १५ कोटींचे टेंडर मुंबई महापालिकेने घेतले मागे

मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्वीनसाठी काढले जाणारे १५ कोटींचे टेंडर पालिका प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल मुंबई महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
पेंग्वीनच्या देखभालीच्या प्रस्तावात फेरबदल करुन पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी पुढील ३ वर्षांसाठी १५ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. या टेंडरवरुन शिवसेनेच्याविरोधात इतर पक्षांचा राजकीय वादही रंगला होता.
पेंग्वीनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणे शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय असा सवाल विरोधकांनी केला होता.

Print Friendly, PDF & Email
Share