‘बनावट मतदान’ला आळा घालण्यासाठी मतदान आयोग सज्ज

◾️फोटो शिवाय ‘मतदान कार्ड’ प्रकरणात नागपूर राज्यात दुसर्यास्थानी

◾️बनावट मतदान थांबविण्यासाठी धडक रणनिती

मुंबई 04: केंद्रीय निर्वाचन आयोग शहरापासून गावापर्यंत बनावट मतदान थांबविण्यासाठी 100% मतदान कार्ड वर फोटो सोबत वोटर लिस्ट तयार करण्यात सज्ज झालेले आहे. याकरिता निर्वाचन आयोगाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांच्या फोटो आणि माहिती व्हेरिफाय करून एकत्रित करीत आहे. याकरिता मतदाराला ऑनलाईन फोटो देखील आयोगाकडे सादर करता येते.

राज्याचे मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 9 कोटी 83 लाख 3 हजार 656 मतदारांपैकी 16 लाख 69 हजार 103 मतदारांच्या फोटो वोटर लिस्ट वर नसल्यामुळे बनावट मतदारांची शक्यता नाकारता येत नाही. 100% फोटो असलेले वोटर लिस्ट बनविण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान नागपूर मध्ये 42 लाख 30 हजार 388 मतदारांचे फोटो निर्वाचन आयोगाकडे नसल्याचे चित्र समोर आलेले आहे. यासोबतच अमरावती , वाशीम , गोंदिया , चंद्रपूर जिल्हात 100% फोटो असलेले मतदान कार्ड व वोटर लिस्ट असल्याची माहिती समोर आलेली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share