आज जिल्हात 2 कोरोना रुग्ण

गोंदिया 02 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 2 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या 0 आहे.आजपर्यंत 41,204 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,496 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4 आहे. 4 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.

Print Friendly, PDF & Email
Share