मनरेगा कामाच्या पाहणीसाठी गट विकास अधिकारी देवरी यांची सावली शाळेला भेट

देवरी 2 : मनरेगा कामाच्या तपासणीकरिता चंद्रमणी मोडक गट विकास अधिकारी पंचायत समिती देवरी, झांबरे साहेब यांनी जि. प. मॉडेल शाळा सावली येथील मनरेगा चे सुरू असलेले दहा कामांची तपासणी केली. शाळेचे मुख्याध्यापक शदीपक कापसे , झुलन पंधरे सरपंच , ग्रामसेवक सुनील शिवणकर व दाते इंजिनिअर मनरेगा यांनी सुरू असलेल्या कामाविषयी इतंभूत माहिती दिली. कंपाउंड वाल ,पेविंग ब्लॉक, बोअरवेल पुनर्भरण, गांडूळ खत प्रकल्प ही 4 कामे पूर्णत्वास आलेली आहेत. गटविकास अधिकारी यांनी कामाची तपासणी करून कामाविषयी समाधान व्यक्त केले. त्यांनी शाळेची काम स्थायी स्वरूपाची असल्यामुळे ती चांगल्या प्रतीची व्हावी अशी मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांच्याकडून आशा व्यक्त केली. रेन वॉटर हार्वेस्टिंग, नाली बांधकाम ,फळ लागवड , मल्टी युनिटटॉयलेट ,ग्राउंड सपाटीकरण अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्णत्वास आणावी असे आदेश दिले. इयत्ता आठवीचे वर्ग सुरू असल्यामुळे वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांची हितगूज साधले. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी राहिलेला अभ्यास पूर्ण करावा अशी आशा व्यक्त केली. तसेच सावली शाळेतील मॉडेल स्कुल घोषित झाल्यामुळे पुढील काळात शासनाच्या अनेक पायाभूत योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील असे सांगितले.
तपासणीवेळी कैलास भेलावे ग्रामपंचायत सदस्य, रमेश पंधरे नंदकिशोर शेंडे ,ग्यानिराम चांदेवार, तुषार कोले , ललित भाऊ पवार सुनिल भेलावे यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share