गोंदिया: एसटीच्या तिकीट मशीनमध्ये अचानक स्फोट : महिला वाहक जखमी

प्रहार टाईम्स
गोंदिया :
एसटीच्या तिकीट मशीनमध्ये अचानक स्फोट झाल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मरारटोली मुख्य आगारात घडली
सदर घटनेत महिला वाहकाच्या हाताचा पंजा भाजला असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. कल्पना मेश्राम (३६) रा. अहेरी असे महिला वाहिकेचे नाव आहे
२५ ऑगस्ट रोजी चालक लीलाधर मडावी रा. अहेरी व महिला वाहक कल्पना मेश्राम रा. अहेरी) हे अहेरी येथून बस क्रमांक एमएच ४०- एक्यू ६३२० घेऊन गोंदियाला गेले असता. दुपारी २.१५ वाजतादरम्यान ते बसस्थानकात पोहचले व प्रवासी उतरत असताना वाहक कल्पना मेश्राम चालकाच्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या तर, तिकीट मशीन समोर ठेवली होती. प्रवासी उतरल्यावर कल्पना मेश्राम यांनी रुट बदलण्यासाठी हात वाढविला होताच की अचानक तिकीट मशीनमध्ये स्फोट झाला व त्यात वाहक कल्पना मेश्राम यांच्या उजव्या हाताचा पंजा भाजला गेला. स्फोट एवढा जबर होता की त्यात मशीन पार वितळून गेली आहे. घटनेनंतर लगेच आगार प्रशासनाला माहिती देऊन वाहक कल्पना मेश्राम यांच्यावर येथील केटीएस रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. व काल २६ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर घटनेमुळे एसटीच्या वाहकाजवळील ईटीएम मशिन जिवंत बाँम्ब ठरत असल्याचे सिद्ध झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मँन्युअल तिकिट पद्धत चलनात आणून इलेक्ट्राँनिक टिकीट मशीन बंद करण्याची मागणी समोर आली आहे. एसटी महामंडळाने स्मार्ट तिकिटांसाठी ईटीआयएम मशीन दिल्या आहेत. या मशीनबाबत अनेक तक्रारीसुद्धा आहेत. आता या मशीनचा स्फोट झाल्याने त्याच्या सुरक्षिततेवरसुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे वाहकांमध्ये थोडे भीतीचे वातावरण आहे.

Print Friendly, PDF & Email
Share