रुग्णवाहिका चालकांचा अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतले ताब्यात

गोंदियाः- आरोग्य सेवेंतर्गत रुग्णवाहिका चालकांची सेवा समाप्त होत असल्याने त्यांचे काय होईल? हा प्रश्न त्यांना सतावतो आहे.म्हणूनच सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत रुग्णवाहिका चालक चंद्रशेखर चरणदास चंद्रिकापूरे यांनी सर्व १०२ रुग्णवाहिका चालकांना एनआरएचएम अंतर्गत नियुक्ती द्यावी, नाही तर त्यांना इच्छामृत्यूची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून केली होती.पत्रात त्यांनी ते आपल्या राहत्या घरी, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषद कार्यालय येथे विष प्राशन करून आत्महत्या करू शकतात असा उल्लेख केलेला होता. मे. अशोकाम प्रा.लि.कंपनी भोपालचे रुग्णवाहिका चालकाचे कंत्राट ३० जुलै रोजी संपल्याने या कंत्राटाअंतर्गत कार्यरत राज्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांवर बेरोजगारीचे सावट निर्माण झाले आहे.त्यांतर्गतच जिल्हापरिषदेसमोर आंदोलन करीत असलेल्या या रुग्णवाहिका चालकांनी आज जिल्हा परिषदेसमोरील रस्ता अडवून अंगावर पेट्रोल घालून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान गोंदिया ग्रामीण पोलिसांनी लगेच धाव घेत त्या रुग्णवाहिका चालकांना ताब्यात घेतले.त्या अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे यांच्यासोबत रुग्णवाहिका चालकाच्या शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केली.त्यावेळी माजी आमदार दिलीप बनसोड हे सुध्दा उपस्थित होते.चर्चेदरम्यान सीईओ यांनी कुठलीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने एका रुग्णवाहिका चालकांने अंगावर पेट्रोल घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस निरिक्षक विनय कोरे यांनी लगेच त्या चालकाला ताब्यात घेतले.

  राज्यातील विविध जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना अनेक वर्षापूर्वी नियुक्ती देण्यात आली होती.अत्यंत तटपूंज्या मानधनावर त्यांना २४ तास सेवा बजवावी लागते आहे.फक्त ८ ते ९ हजार रुपये मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे. तरी आरोग्य सेवेसाठी त्यांनी कधीही नकार दिला नाही. एवढ्या कमी मानधनावर त्यांना मुलांचे शिक्षण, औषधोपचार, कपडे व कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. आता तर त्यांची ही सेवाही समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. बिजेपार येथील आरोग्य केंद्रात कार्यरत चंद्रशेखर चंद्रिकापूरे यांनी १९ जुलै रोजी राष्ट्रपती यांना पत्र लिहून एनआरएचएम अंतर्गत नियुक्ती पत्र मिळाले नाही तर विष पिऊन जीवन संपवण्याची माहिती दिली आहे.

एनआरएचएम अंतर्गत नियुक्ती देण्याची मागणी रुग्ण वाहिका चालक सी.ओ. टेंभुर्णीकर, आर.एम. भोयर, एम.टी. बुरले, एस. जे. चौधरी, पी.जी.पठान, पी.जी. बारेवार, एस.बी. उके, पवनकुमार काळसर्पे, राजेश खिरेकर, एन. बी.पडोळे, नंदकिशोर आगासे, किशोर लंजे, घनश्याम उरकुडे, सतीश नागपूरे, शशिकांत खेडीकर, रमन भोयर, उत्तम राऊत, नरेंद्र हुकरे, सुरेश रोकडे, नरेश उईके, मनोज तिवारी, मयूर ठवकर, क्रिष्णा शहारे, शिवणकर, महारवाडे, डोहरे, विजय चंद्रिकापूरे, सुरेश रोकडे, जहीर शेख, अल्ताफ पठाण, मनोज उपाध्याय व इतरांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share