नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच…’; खुद्द मोदींच्या भावानं केले जाहीर

मुंबई 01: 2014 साली पंतप्रधान मोदी जोरदार प्रचारानंतर सत्तेत आले. या निवडणूकीत भाजपने नरेंद्र मोदींची चहावाला अशी प्रतिमा उभी केली. लोकांनीही या भावनिक सादेला चांगला प्रतिसाद देऊन मोदींना सत्तेत बसवलं. त्यानंतर एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो असं वाटलं नव्हतं, असं पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यानंतर आता खुद्द नरेंद्र मोदींच्या भावानेच नरेंद्र मोदींचं गुपित फोडलं आहे.

प्रल्हाद मोदी हे नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ आहेत. त्यांना उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी हे चहावाले नाहीत, असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी चहावाले नाहीत, तर आमचे वडिल दामोदरदास मोदी चहावाले होते, असं प्रल्हाद मोदी म्हणाले आहेत.

आमच्या वडिलांनी आम्हा 6 भावंडांना चहा विकून मोठं केलं. ते चहावाले होते, नरेंद्र मोदी चहावाले नाहीत. पत्रकार नेहमी त्यांना चहावाले म्हणतात. तुम्ही हवं तर नरेंद्र मोदींना चहावाला म्हणा,पण मला चहावाल्याचा मुलगा म्हणा, अशी विनंती त्यांनी पत्रकारांना केली आहे. यानंतर ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान,‘मोदी’ नावाचा कामाच्या ठिकाण त्रास होतो, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी केलं होतं. याशिवाय मोदी आम्हाला कधी भेटतसुद्धा नाहीत. मी मोदींना 2002 नंतर भेटले नाही, असं सोनल मोदी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मोदी कुटूंबात वाद आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •