✈️ राफेल लढाऊ विमानाची 7 वी तुकडी पोहोचली भारतात

राफेल लढाऊ विमानांची 7 वी तुकडी बुधवारी रात्री भारतात पोहोचली. या विमानाने 8 हजार किलोमीटरचा प्रवास केला. यामध्ये 3 विमान भारतीय सैन्यात दाखल झाले असून आता याची संख्या 24 वर पोहोचली आहे. या विमानाला पश्चिम बंगालमधील हासीमारीमध्ये तैनात करण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या 1,000 कामांची चौकशी होणार

भाजप सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झालेल्या 1000 कामांची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होणार आहे. विजयकुमार समितीने आपल्या अहवालात ही शिफारस केली असून उर्वरित 128 कामांची विभागीय चौकशी करावी, असेही समितीने राज्य सरकारला सुचवले आहे. अनेक कामे ई-टेंडर न काढता करण्यात आली. काम न करता देयके अदा केली. अशी माहीती आहे.

?? दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापे

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दैनिक भास्कर समूहाने करोना काळात गंगा नदीत वाहून आलेल्या मृतदेह आणि दुसऱ्या लाटेसंबंधी इतर राज्यांतील कोरोना परिस्थितीबद्दल वार्तांकन केलं होतं. ज्यामुळे हा माध्यम समूह चर्चेत आला होता.

?? कोरोनामुळे 14 महिन्यांतच 1.19 लाख मुले अनाथ: अहवाल

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या 14 महिन्यांतच भारतातील 1.19 लाख मुलांसह 21 देशांतील 15 लाखांवर अधिक मुलांनी आपले आई-वडील किंवा संगोपन करणारे आप्तेष्ट गमावले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग ॲब्यूझ (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे (एनआयएच) हे अध्ययन प्रसिद्ध हेल्थ जर्नल द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाले आहे.

? कोल्हापूरला पुराचा धोका तर चिपळूण शहर पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं असून 77 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्यानं जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान NDRF च्या तुकड्या दाखल झाल्या आहेत.
तर चिपळूणमध्ये 2005 ची पुनरावृत्ती, संपूर्ण शहर पाण्याखाली, चिपळूण-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद

? सोनेचांदी आजचा भाव काय?

आज सोन्याच्या दरात 180 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,120 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,120 रुपये इतका आहे. चांदी च्या भावात 900 रुपयांची घसरण झाली असून आज 1 किलो चांदीचा भाव हा 66,600 रुपये इतका झाला आहे.

? पेगॅसस: हेरगिरीचा सर्वात मोठा प्रोजेक्ट

थरुरांच्या अध्यक्षतेखालील समिती हेरगिरीवर केंद्राला प्रश्न विचारणार आहे. माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील संसदीय स्थायी समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय आणि संचार विभागाच्या प्रतिनिधींना 28 जुलैला हजर राहण्यास सांगितले आहे. या दरम्यान डेटा सुरक्षा आणि नागरिकांच्या गोपनीयतेबाबत चर्चा केली जाईल.

? आज भारतात वन प्लस Nord 2 लॉन्च होणार

आज भारतात प्रिमियम स्मार्टफोन कंपनी वन प्लसचा नवा स्मार्टफोन वन प्लस Nord 2 लॉन्च करण्यात येणार आहे. याची किंमत 25,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते. वन प्लस Nord 2 5G मध्ये 6.43 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनचे दोन व्हेरियंट्स 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज, तसेच 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसोबत, 4500mAhची बॅटरी असेल. सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.

? जाणून घ्या देशातील आजची कोरोना स्थिती (22 जुलै )

▪️एकूण सक्रिय रुग्ण : 4,03,602
▪️एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 3,04,21,820
▪️ कोरोनामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू : 4,19,021
▪️ देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 41,78,51,151

Print Friendly, PDF & Email
Share