लायन्स क्लबचा विश्वसेवा सप्ताह उत्साहात साजरा

लायन्स क्लबचा विश्वसेवा सप्ताह उत्साहात साजरा

प्रहार टाईम्स 
देवरी १४-

विविध उपक्रम राबवून लायन्स क्लबतर्फे विश्वसेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. लायन्स क्लब हि संघटना २ ते ८ ऑक्टोबर हा सप्ताह विश्वसेवा सप्ताह म्हणून नानाविविध उपक्रम राबवून साजरा करीत असते.

लायन्स क्लब देवरीच्या वतीने २ ऑक्टोबर ला गांधी जयंती, लालबहाद्दूर जयंती, स्वच्छता अभियान राबविला, ३ ऑक्टोबर ला भररेगाव येथे वृक्षरोपन करण्यात आले, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सहभाग दर्शविला , कापड वाटप करण्यात आले , ५ ऑक्टोबर ला मास्क चे वाटप व योग चे महत्व पटविण्यात करण्यात आले, ७ ऑक्टोबर ला निबंध स्पर्धा आणि गौ सेवा करण्यात आली आणि ८ ऑक्टोबर ला देवरी कोविड सेंटर येथे नेब्युलायसेर मशीन वाटप करण्यात आली. सदर कार्यक्रमध्ये पिंकी कटकवर, लक्ष्मी पंचमवार , मुख्याध्यापिका ज्योति डाबरे रामटेककर , गीता बहेकार उपाध्यक्ष शाला व्यवस्थापन समिति सह लायन्स क्लब चे सदस्य उपस्थित होते त्याच बरोबर डॉ आंदन गजभिये, डॉ ग़ुलाने, डॉ रोशन थोटे, पुष्पा नलपते, धनेश्वरी कटरे, नितेश गजभिये या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
PraharTimes

PraharTimes

Leave a Reply

Your email address will not be published.