दिवाळी च्या आधी 2000 मिळणार चर्चेला पूर्णविराम

प्रतिक रामटेके / प्रहार टाईम्स

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) ही मोदी सरकारची (Modi Government) एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गंत प्रतिवर्षाला शेतकऱ्यांना शेतीसाठी 6000 रुपयांची मदत करण्यात येते.

मोदी सरकार शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) शेतीसाठी तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा पुढील हप्ता पाठवण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत पाठवण्यात येणारा सातवा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 1 डिसेंबरपासून दिला जाणार आहे. मनीकंट्रोलमधील वृत्तानुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल.
या योजनेअंतर्गत विविध टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना तीन हप्त्यात प्रत्येकी 2 हजार असे 6 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत 6 टप्प्यात शेतकऱ्यांना हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यात केंद्राने 11.17 कोटी शेतकऱ्यांना 95 कोटींची मदत केली..

Print Friendly, PDF & Email
Share