पोलीस विभागाद्वारे राष्ट्रीय एकता संकल्प दिवस साजरा

डॉ सुजित टेटे / प्रहार टाईम्स

देवरी 31: राष्ट्रीय एकता संकल्प दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मा. विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. सदर कार्यक्रमात राष्ट्रीय संकल्प दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने अतुल कुलकर्णी (भा पो से)अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कैम्प देवरी, विजय कुमार धुमाळ वाचक सपोनि कार्यालय देवरी, कमलेश बच्छाव प्रभारी अधिकारी नक्षल ऑपरेशन सेल देवरी, किशोर लिल्हारे वाचक, पो उ प नि देवरी व इतर शाखा तसेच पोलिस स्टेशन मधील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय एकता संकल्प दिवसाची शपथ सकाळी 11 वाजता घेण्यात आली असुन सोशल डिस्टन्स थेवुन कार्यक्रम संपन्न झाला.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •