अवैध दारू विक्रेत्याचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी / सावली : स्थानिक पोलीस ठाण्यात अवैध मोहफुल दारू विक्री प्रकरणातील आरोपीने स्वच्छतागृहात फिनाईल सदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असुन ह्या घटनेने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सावली येथे काल २२ मे २०२१ रोजी पोलिसांनी गस्तीदरम्यान किसान नगर भागात धाड घालुन अवैध मोहफुल दारूविक्री करणाऱ्यांना अटक करण्याच्या कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला व अटकेसाठी गेलेल्या वाहनावर दगड फेक केली . त्यानंतर पळून गेलेले आरोपीने काल रात्रौच्या दरम्यान परिवाराला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जमा झाले . दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली . मात्र पहाटेच्या सुमारास ह्यातील आकाश नामक आरोपीने स्वच्छता गृहात हारपिक सदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला . ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी त्याला तात्काळ सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले.त्यानंतर चंद्रपूर येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सध्या आरोपीची प्रकृती ही धोक्याबाहेर असल्याचे कळते . सदर आरोपीवर अजूनही अटकेची कारवाई होणे बाकी होते मात्र पोलीस मारहाण करतील या धास्तीने आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार शिरसाट करीत आहे .

Print Friendly, PDF & Email
Share