8 लाखांच्या गांजासह एकास अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधी / गोंदिया : कामठा येथील नामे घनश्याम ऊर्फ मोनू हरीचंद अग्रवाल (वय २५) याच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा एकुण किंमती ८ लाख ४३ हजाराचा जप्त करण्यात आला. ही कारवाई १३ मे रोजी रात्री ९.१० वाजता कामठा येथे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कामठा येथील घनश्याम ऊर्फ मोनू हरीचंद अग्रवाल यांच्या घरून तो गांजा जप्त केला आहे.
घनश्याम अग्रवाल याने आपल्या घरी भाड्याच्या खोली बिरसी विमानतळावर स्टोअर किपर विकास दिनेश शर्मा (वय ३०) रा. मुरादाबाद उत्तरप्रदेश यांना दिली आहे. त्यांच्या खोलीच्या मागे असलेल्या १२ बाय १० लांबी रुंदीच्या दुसऱ्या खोलीत तिन मोठया प्लॅस्टीक पाेतडीत ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा ठेवला होता. तो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, राजू मिश्रा यांनी केली आहे. या प्रकरणात ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत बाजारभावाप्रमाणे ८ लाख ४३ हजार रुपये आहे. आरोपी मोनू अग्रवाल याच्यावर रावणावडी पोलीसांनी मादक पदार्थ विरोधी अधिनियम कलम ८, २० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कामठा येथील घनश्याम ऊर्फ मोनू हरीचंद अग्रवाल ( वय २५) याला गांजासह अटक केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने तो गांजा ओरीसा येथून गोंदियात आणल्याची माहिती दिली. त्याला तो गांजा कुणी आणून दिला या बाबत त्याने माहिती दिली नाही.

Print Friendly, PDF & Email
Share