देवरी 17 :-
देवरी येथिल नगरपंचायत कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी देवरी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष कौशल्याबाई कुंभरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना नगरपंचायचतचे मुख्याधिकारी अजय पाटनकर यांनी वाचनाचे महत्व पटवून दिले. वाचनाने फक्त ज्ञान मिळत नाही तर भाषा देखिल समृद्ध होत असते. आजच्या युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मोबाईलच्या माध्यमातून ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत, त्याचा उपयोग करायला पाहीजे.
यावेळी विरेन्द्रं आचले, रमेश बोम्हनवार, अक्षय झिरपे, कैलास सोनवाने, विजय पटले, सचिन मेश्राम, प्रियंका कावळे, विठ्ठल हजारे,अरुण धारगावे, वामन फुन्ने , ईरफान खान ,देवचंद बहेकार , हेमु यावलकर व संपुर्ण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Share