देवरीत आढळला दुर्मिळ वाळा साप

देवरी २०: देवरी आमगाव रोड वर आज सकाळी दुर्मिळ जातीचा वाळा साप आढळून आला. हा साप रस्ता ओलांडत असताना अजित टेटे यांनी या सापाला जीवनदान दिले असुन सदर सापाला जंगलात सोडण्यात आले आहे.

वाळा ( बिनविषारी साप )

स्थानिक नाव- दानव साप, आंधळा साप

इंग्रजी नाव – worm snake

रंग – या सापाचा रंग लालसर काळा किंवा तांबूस तपकिरी असतो.

लांबी – वाळा हा साप भारतातील सर्वात लहान साप असून जेमतेम १० ते १५ से. मी. लांब असतो.

भक्ष्य – या सापाचे भक्ष्य गांडूळ, मुंग्याची अंडी, मुंग्या, वाळवी व अळ्या….

वसतिस्थान – वाळा हा साप आयुष्याचा बराच काळ जमिनीखाली घालवतो. पावसाळ्यात हा साप जमिनीवर येतो. पालापाचोळ्यात वास्तव्य करतो. हा साप भारतात सर्वत्र आढळतो.

प्रजनन – वाळा सापाची मादी ६ ते ७ अंडी घालते.

वैशिष्टय़े – वाळा हा साप गांडूळा सारखा दिसतो. त्याचे चकचकीत व गुळगुळीत खवले असतात. या सापाचे शेपटी व तोंड सारखेच दिसते. या सापाचे डोळे खुपच लहान असतात. ते आपल्याला दिसतही नाहीत, म्हणून या सापास आंधळा साप असे म्हणतात.

Print Friendly, PDF & Email
Share