पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली रेंज) संदीप पाटील यांचे हस्ते देवरी उपमुख्यालय मधे पोलिस भर्ती पूर्व नक्सलग्रस्त भागातील प्रशिक्षणार्थिनां बक्षिस व शालेय विध्यार्थ्याना सायकल भेट

देवरी १४: पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली रेंज) संदीप पाटील च्या हस्ते देवरी उपमुख्यालय मधे पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण मधे उत्कृष्ट नक्सलग्रस्त भागातिल प्रशिक्षणार्थिना बक्षिस देन्यात आले.

गोंदिया जिल्हा दौरावर आलेले पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली क्षेत्र) संदीप पाटील यांनी देवरी पोलिस उपमुख्यालयला भेट दिली. यावेळी पुलिस उपमहानिरिक्षक यांनी नक्सलग्रस्त भागातिल शालेय विद्यार्थ्याना सायकल वितरण करुण पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण मधे होनहार प्रशिक्षणार्थिना बक्षिस देवुन गौरान्वित केले.

प्राप्त माहिती नूसार 12 फेब्रु ला पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षणचे आयोजन नक्सलग्रस्त भागामधे केले होते. त्यामधे 40 युवक व 14 युवती एकुण 53 प्रशिक्षनार्थी सहभागी झाले होते. मैदानी व लिखित परिक्षेमधे उत्कृष्ट प्रदर्शन केलेले धीरज देवाजी राऊत, रुणाल राऊत, संदीप रामाजी शेंडे, रेशमा पंधरे, रीता उईके, हेमलता पदे यांना पोलिस उपमहारिक्षक संदीप पाटील यांनी पुरस्कार देवुन गौरान्वित केले असुन नक्सलग्रस्त भागातिल शालेय विद्यार्थिनी रज्जुला रेवहसिंह हिड़ामी नि. लवारी, गडचिरोली, शेहर्ष रामटेके देवरी, सोनम ठाकरे चान्ना/कोड़का, गंगा कुंभरे कन्हाळगाँव, गोंदिया यांना साइकिल भेट देन्यात आली.

या वेळी पोलिस उपमहारिक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, एसडीपीओ देवरी जालिंदर नालकुल, देवरी पोलिस निरीक्षक अजित कदम, देवरी उपमुख्यालय प्रभारी अधिकारी, नक्सलसेल अधिकारी, सी-60 पथक अधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share