चिचगड येथे महिला काँग्रेस तर्फे हळदी कुंकू व महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन

सेकड़ो महिलांची उपस्थित

चिचगड येथील वीर बिरसा मुंडा स्मारका जवळ आयोजन

देवरी, ता.३०; महिला काँग्रेसच्या सीमाताई कोरोटे व देवरी तालुका महिला काँग्रेसच्या संयुक्त विद्यमानाने मकर संक्रांति निमित्य महिलांकरिता सामूहिक हळदी कुंकू व महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन रविवार(ता.२९ जानेवारी) रोजी चिचगड येथील वीर बिरसा मुंडा यांच्या स्मारका जवळ करण्यात आले.


या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे संयोजिका सीमाताई कोरोटे यांच्या हस्ते आणि जि.प.च्या माजी अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली व दिप प्रज्वलन महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उषाताई शहारे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया, माजी जि.प. सदस्य माधुरिताई कुंभरे, आमगांव तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष छबुताई ऊके, चिचगड चे सरपंच कल्पनाताई गोस्वाम, माजी सरपंच अर्चनाताई नरवरे, किरणताई राउत, पूजाताई कटकवार, पिपरखारी चे सरपंच धनश्रीबाई गंगासागर, वांढराचे सरपंच मीराबाई कुंजाम, उपसरपंच प्रमिलाताई गावळ, माजी सरपंच आनंद अत्तरगड़े, गडेगावचे सरपंच कविताताई वलदे, सरपंच लीलाबाई मूंदी, फुलवंताबाई बगड़ेरिया, देवरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्राताई अगडे, कलाबाई सरोटे, पिंड़केपारचे सरपंच प्रमिलाबाई घासले, माजी सरपंच जसवंताताई भारद्वाज, सामाजिक कर्तकर्ता निशा परिहार यांच्या सह चिचगड क्षेत्रातील सेकड़ो महिला वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी उपस्थितीत महिलांना संदीप भाटिया, छबुताई ऊके, उषाताई शहारे, उषाताई मेंढे व सीमाताई कोरोटे यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.
दरम्यान महिला काँग्रेस तर्फे उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून वान चे वाटप केले. सोबतच महिलांसाठी संगीत खुर्ची व उखाने म्हणणे स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन चिचगडच्या ग्रा. पं. सदस्य अश्मिता ताई राऊत यांनी तर उपस्थितांचे आभार महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्राताई अगडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता चिचगड च्या ग्रा. पं.सदस्य शाईनताई सैय्यद, सीमाताई राऊत, सुनीता नंदागवळी, राधिकाताई धरमगुळे, वत्सलाबाई लटये, निताताई कोल्हारे, नसीमा शेख, किरणताई राऊत, प्रीति सलामे, सुमनताई सलामे, लक्ष्मीताई धानगाये, पूजा कोल्हारे, शोभाताई तोमर, अश्मिता धानगाये, ममता कोल्हारे यांच्या सह देवरी व चिचगड क्षेत्रातील महिला काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share