देवरी येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा विशाल मोर्चा

येथील परसटोला वरुन एस.डी.ओ कार्यलयावर धड़क मोर्चा.

देवरी, ता.२९; देशातील लाखो शेतकरी हे दोन महिन्यापासुन दिल्लीच्या बॉर्डरवर केंद्र सरकारने बनविलेले तीन कृषि काळे कायदे रदद् करा या मागणीला धरून आंदोलन करित आहेत. यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देवरी तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने बुधवारी(ता.२७ जानेवारी) रोजी देवरी येथील परसटोला वरुन येथील एस.डी.ओ. कार्यलयावर शेतकरी व शिवसैनीकांनी विशाल मोर्चा काढून सदर तिन्ही कृषि काळा कायदा मागे घ्यावा या मागणीला धरून देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन सादर केले.


परसटोला वरुन निघालेल्या या मोर्च्याचे चिचगड मार्गावरील रानी दुर्गावती चौकात सभेत रूपांतर होवून या सभेत मार्गदर्शन करतांनी देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी शिवसेना जरी सत्तेत असली तरी. जनतेच्या हिताकरिता सदैव रस्त्यावर उतरेल असे म्हटले. तर जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांनी गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या हिताकरिता आंदोलन आम्ही करित राहु असे म्हटले तसेच आमगांव-देवरी विधानसभा संघटक राजिक खान यांनी सुद्धा मार्गदर्शन करतांनी म्हणाले की, मोदीजी आपन या देशात खुप विकास केला. आता शेतकरी तुम्हाला सत्तेतुन पापउतार करतील असे म्हटले.


या दरम्यान शिवसेनेच्या चिचगड जि.प.क्षेत्र शाखेतून आलेल्या शेतकरी व शिवसैनिकांनी चिचगड येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सचिव पदावर कार्यरत श्री खंडारे यांना पापउतार करण्या संबंधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले नंतर सदर निवेदन संबधित अधिकाऱ्यांना देवुन या बाबद चौकशी करुण कारवाई करण्या संबंधात सूचना दिल्या या नंतर शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने बनविलेले तिन्ही कृषि काळा कायदा रदद् करा. या मागणीला धरून देवरी चे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन सादर केले.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्ठमंडळात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शहर प्रमुख राजा भाटिया, उपतालुका प्रमुख शम्भू घाटा, डालचंद मडावी, प्रचार प्रसार प्रमुख भूमेश पटले, शहर समन्वयक परवेझ पठान, नरेश बंसोड़. विभाग प्रमुख गोविंद बंसोड़, माजी उपसभापति गणेश सोनबोईर, प्रकाश सोनबोईर, शिवसैनिक महेश फुन्ने, विलास राऊत, राजा मिश्रा, छन्नू नेवरगड़े, संजय भांडारकर, देवरी शहर महिला आघाडी प्रमुख प्रीति उइके, सलमा राऊत, प्रीति नेताम, वंदना राऊत, स्वीटी नेवरगड़े चिचगड क्षेत्रातील शेतकरी अनिल घोटे, अंकित घोटे, सदरु बंदे अली, नीलेश मोहूर्ले, बलदेव शाहु, जितेंद्र उईके यांच्या सह देवरी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व शिवसैनिकांचा यात समावेश होता.


या मोरच्याचे संचालन तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी तर उपस्थितांचे आभार शहर प्रमुख राजा भाटिया यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share